नमस्कार, मी मधुकर केरू गिते, राहणार मेंढी, ता. सिन्नर, जि. नाशिक. येथे ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेसाठी अल्पदरात व्यसनमुक्ती केंद्र चालवितो. श्री.किरण बडगुजर माझ्या एका मित्रांच्या ओळखीने आमच्या केंद्रात आले व आमचेच झाले. आमच्या विहिरीचं पाणी अतिरिक्त क्षारामुळे बेचव लागते. त्या पाण्याचा घोट घेताक्षणीच सरांनी मला सांगितले की जर मी देणार असलेला R. O. तुम्ही वापरला तरंच हयापुढे आपण बोलू. त्यांच्या ह्या प्रेमळ धमकीने आम्ही भारावून गेलो. त्यापुढे एक ना अनेक मार्गाने सरांनी केंद्राला मदतच केली. अल्पदरात व्यसनमुक्ती केंद्र चालवायचे पण हिशोबाचे गणित काही बसत नव्हते. तेव्हा आमच्या पेशंट साठी जवळजवळ दोन वर्षे दरमहा 8ते 9हजारांचा किराणा पुरवला. त्यांचे दातृत्व एवढ्यावरच थांबले नाही. पेशंट साठी थंड पाण्याचे (water cooler ), बायोगॅस, सोलर वॉटर हीटर, दर दिवाळीत पेशंटला फराळ, संस्थेच्या नव्या हॉल साठी पत्रे, जुनं नवं सामान, त्यांच्या नवीन चॉकोलेट फॅक्टरी चे चॉकोलेट, पेशंट च्या वर्क थेरेपी अंतर्गत केलेल्या दूध प्रकल्पातील गाईंसाठी त्यांच्या Mac Aura फॅक्टरीतले calcium तसेच गाईंचे व पिकांचे औषधं ई. पुरवले. मी काम करीत असलेल्या शिवगर्जना कला मंच संस्थेच्या बांधकामासाठी तब्बल 500 गोणी सिमेंट हे निरपेक्ष मनाने पुरवले.
ह्या व्यतिरिक्त आमच्या संस्थेला "कमी तिथे आम्ही "ह्या तत्वाने केंद्राचं कोणतंच काम थांबू दिलं नाही. वेगवेगळ्या व्यक्तींना संस्थेची ओळख करून देणे व माझे मनोबल उंचावण्यासाठी माझा आधारस्तंभ बनून सदैव माझ्या पाठीशी राहणे, ह्या त्यांच्या मदतीची तुलना कशातच होऊ शकत नाही.
आजही प्रत्येक कामासाठी कोणतीही मदत करायला सदैव तत्पर असे श्री. किरण बडगुजरव त्यांची आदित्य फाऊंडेशनखूप प्रगती करो हिच सदिच्छा.
श्री. मधुकर केरू गिते
मेंढी, ता. सिन्नर, जि. नाशिक