दानाला फक्त अर्थ नसतो तर परमार्थ देखील असतो. खरतर, आपल्यात दान देण्याची कुवत निर्माण होणं हे कुठल्या वरदानापेक्षा कमी नसतं. एका सामान्य घरातला मुलगा ते आज प्रतिथयश उद्योजक असा संघर्षमय प्रवास केलेल्या नाशिक स्थित डॉ श्री किरण बडगुजर यांनी हे जाणलं आणि समाजातल्या गरजूंना आधार देण्यासाठी ‘आदित्यम फाउंडेशन-किरण आशेचा’ ही सेवाभावी संस्था 2012 साली स्थापन केली. समाजातला कुठलाही एक विशिष्ट घटक केंद्रस्थानी न ठेवता जिथे गरज तिथे आम्ही हा संस्थेच्या काम करण्याचा दृष्टीकोण राहिलाय. आदित्यमचा अर्थ सूर्य असा होतो आणि दान हे देखील सूर्यासारख असतं… जिथे केलं जातं तिथली प्रत्येक गोष्ट ते उजळून टाकतं.


आदित्यम फाउंडेशनच्या कार्याचा प्रकाश सुद्धा असा अनेक ठिकाणी पसरलाय. असं म्हणतात की घरातल्या करत्या माणसाचं आयुष्य सावरलं की घरातल्या सगळ्याच माणसांचं आयुष्य सावरलं जातं. संस्थेने पुढाकार घेतल्याने अनेक व्यसनाधीन व्यक्तींची आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबियांची आयुष्य देखील सावरली आहेत.

Read more


सामाजिक कार्य

आदित्यम् फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ अशीच तेजात राहणार आणि समाजाचा एक घटक म्हणून डॉ. किरण बडगुजर हे समाजासाठी मोलाचे कार्य मोठ्या आनंदाने करणार तसेच आदित्यम् फाऊंडेशनचे सदस्य (खालील प्रमाणे ) या कार्यात मोलाचा वाट उचलत आहेत.

TOP